संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) मधिल पसार आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील रहीवासी 1) सोहेल उर्फ आफताब उर्फ मोंढा अकील खान पठाण रा. स्टेशल फैल, वर्धा 2) शादाब खान उर्फ बेंड मुकत्यार खान पठाण रा. बोरगांव (मेघे) हे वर्धा शहर हद्दीत तसेच आजुबाजुच्या पोलीस स्टेशन हद्दीत निरंतर आपली दशहश निर्माण करून संगणमताने गुन्हे करीत असुन त्यांचेविरूद्ध भरपुर शरीराविरुद्धच्या गुन्हयाची नोंद आहे. तसेच त्यांचेवर आवश्यक प्रतीबंधक/ तडीपार कार्यवाही करण्यात आली. परंतु आरोपी हे सुटुन आल्यानंतर परत-परत गुन्हे करीत होते. दिनांक 09.08.2026 रोजी आरोपी नामे 1) सोहेल उर्फ आफताब उर्फ मोंढा अकील खान पठाण 2) शादाब खान उर्फ बेंड मुकत्यार खान पठाण 3) आयुष अजय नगराळे रा. सिद्धार्थ नगर, बोरगांव (मेघे), वर्धा यांनी बळजबरी तक्रारदाराचे घरात घुसुन त्यांचेवर हमला करून त्यांना चाकुचा धाक दाखवुन लज्जीत केल्याचा गंभीर गुन्हा केल्याने तक्रारदाराचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे भा.न्या.सं. चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा प्राथमीक तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पो.उप.नि. शरद गायकवाड यांनी त्यांचे पथकासह करून आरोपीतांचे संघटीत गुन्हेगारी कृत्याला आळा बसविण्याकरीता त्यांचेवर ठोस कार्यवाही करणे असल्याने मा. पो.नि. सा. श्री नागेशकुमार चतरकर यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. शरद गायकवाड, पो.उप.नि. सुनिल राम यांनी मकोका कायदयाअन्वये प्रस्ताव तयार करून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. वर्धा तसेच मा. पोलीस अधिक्षक सा. वर्धा यांचे मार्फत मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नागपुर परीक्षेत्र नागपुर यांचेकडे पाठविला असता आरोपीविरूद्ध मकोका कलम वाढ करण्याची परवानगी देण्यात आल्याने आरोपीविरूद्ध संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अन्वये कलम वाढ करण्यात आली होती.
सदर गुन्हयातील दोन आरोपीतांना यापुर्वीच अटक करण्यात आली असुन पसार आरोपी शादाब खान उर्फ उर्फ बेंड मुकत्यार खान पठाण पठाण यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कार्यवाहीमुळे संघटीत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. श्री सदाशिव वाघमारे, मा. उविपोअ सा. श्री सुनिल महाडीक, मा. पो.नि.श्री नागेशकुमार चतरकर सा. यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी पो.उप.नि. शरद गायकवाड, पो.उप.नि. सुनिल राम, व डि.बी. अंमलदार विवेक बन्सोड, राजेंद्र हाडके, गजेंद्र धर्मे, प्रशांत वंजारी, महेंद्र पाटील, नितीन ईटकेर व पथकातील सदस्यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढिल तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. उपविभाग वर्धा हे करीत आहे.



