ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांत फरार असलेला सराईत आरोपी राजेंद्र उर्फ लड्डू किराड याला नागपुरातून अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र करत पोलीस स्टेशन हिंगणघाट व पोलीस स्टेशन रामनगर (जिल्हा वर्धा) येथील एनडीपीएस (NDPS) अॅक्टच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दीर्घ काळापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला नागपूर शहरातून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी चे नाव राजेंद्र उर्फ लड्डू राजाभाऊ किराड वय ४१ वर्ष, रा. महेश नगर, स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागे, नागपूर असून सदर आरोपी हा खालील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होता

१. पोलीस स्टेशन हिंगणघाटः अपराध क्रमांक ९९२/२६ कलम ८ (क), २० (ब) (ii), २९ NDPS अॅक्ट (या गुन्ह्यात अधिकृत अटक दर्शविण्यात आली आहे).

२. पोलीस स्टेशन हिंगणघाटः अपराध क्रमांक १०००/२६ कलम ८ (क), २० (ब) (ⅱ), २९ NDPS अॅक्ट. ३. पोलीस स्टेशन रामनगरः अपराध क्रमांक ५५७/२५ कलम ८ (क), २० (ब), २१ (b), २९ NDPS अॅक्ट. कारवाईचा तपशीलः

गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर शहरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून, पोलीस पथकाने नागपुरात सापळा रचून आरोपी राजेंद्र उर्फ लड्डू किराड यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील अपराध क्रमांक ९९२/२६ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई श्री. सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा व श्री. सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट व श्री. अनिल राऊत पोलीस निरीक्षक, पो.स्टे. हिंगणघाट यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार सुनील मेंढे आणि पोलीस नाईक नरेंद्र आरेकर सर्व पो.स्टे. हिंगणघाट यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये