ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य टिळकांचा पुतळा सभोवताल परिसर घाणीच्या साम्राज्यात!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         वर्धेतील टिळक चौक गोल बाजार भाजी मार्केट परिसरात मुख्यतः लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या सभोवताल सडलेला भाजीपाला व कचरा मोठ्या प्रमाणात साचून आहेत सदर ठिकाणी दिवसेंदिवस कचऱ्याचे साम्राज्य वाढतांना दिसत आहे त्यामुळे परिसरातील रहिवासी नागरिकांना व ग्राहकांना नाकाला रुमाल बांधून राहावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहेत

            काही महिन्यांपूर्वी टिळक चौक गोल बाजार भाजी मार्केट च्या आतील भागात पोलीस चौकी चे उदघाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले असून अवघ्या काही दिवसांतच पोलीस चौकी कायमची बंद सुद्धा करण्यात आली आहे त्यासोबतच सदर ठिकाणी सौंदर्यीकरनावर व प्रसाधन गृहावर लाखो रुपये खर्च करूनही कुठल्याही क्षणी आतमध्ये जातांना लोकं उघड्यावर लघुशंका करतांना दिसतात तसेच त्या ठिकाणी खुलेआम दारू विक्री व दारूचा ढोस मारण्याचा अड्डा झालेला दिसून येतो तसेच त्या ठिकाणी बेकायदेशीर धंदा मोठ्या प्रमाणात फोफावला आहेत*

          महत्वाची बाब म्हणजे दिवसाची सुरुवात भाजी पासून होत असते आणि भाजी खरेदी करण्यासाठी आतमध्ये जातांना सर्वप्रथम ग्राहकांना येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल बांधूनच आत शिरावे लागते व आतील मोठ्या प्रमाणात असलेल्या अस्वच्छतेमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या शेकडो हजारो माशा युक्त भाजी वर्धेकरांना खरेदी करावी लागते त्यामुळे नागरिकांचे खरंतर आरोग्य बिघडते परंतु याचे वर्धा नगरपालीकेला काहीही सोयरसुतक नाही हे तेथील अस्वच्छतेवरून स्पष्ट दिसून येते*

       पाच वर्षांपूर्वी वर्धा नगरपालिकेत भाजपची सत्ता असतांना वर्धा नगरपालिकेला स्वच्छ व सुंदर वर्धा शहर यांसाठी चार कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला होता हे विशेष तसेच राज्यात व केंद्रात सर्वत्र विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका अगदी वेळेवर लागत आहे परंतु आम जनतेसाठी दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी अति महत्वाचे असलेले नगरसेवक ,नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून लागत नाही ही बाब लोकशाही दृष्ट्या अत्यंत घातक आहे परंतु वरील परिस्थिती लक्षात घेता असे निदर्शनास येते की नगरसेवक नगराध्यक्ष पाठोपाठ आमदार खासदार मुख्याधिकारी हे सुद्धा पदांवर नाहीत का ? कार्यरत नाहीत का ? असा प्रश्न आम जनतेला पडतो आहे*

       वर्धेतील लोकमान्य टिळक चौक परिसर हा 1909 च्या पूर्वीपासून जाजोदिया यांच्या मालकीचा असून त्यांनी मागील अनेक वर्षांपूर्वी आज अस्तित्वात असलेले लोकमान्य टिळक भाजी मार्केट ची जागा वर्धा नगरपालिकेला केवळ रामानुज सरोवर बगीच्या साठी हस्तांतरित केली होती मात्र वर्धा नगरपालिकेने मूळ विषय बाजूला ठेवून नगरपालिकेला उत्पन्न मिळावं यादृष्टीने सदर जागेवर टिळक भाजी मार्केट निर्माण केलं महत्वाची बाब म्हणजे सदर जागा ज्या कामासाठी दिली आहे त्या ठिकाणी तोच उपक्रम राबविला जावा असा नियम असतांना सुद्धा नियमाला बगल देऊन नगरपालिकेने आपल्या उत्पन्नाचा विचार करून सदर ठिकाणी टिळक भाजी मार्केटचे बांधकाम करून एकप्रकारे बेकायदेशीर धंद्याचे माहेरघर किंवा सडलेल्या भाजीचे व कचऱ्याचे माहेरघर निर्माण केले आहेत

      वर्धेतील टिळक भाजी मार्केट परिसरातील व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या लगत असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे सतत येत असलेल्या दुर्गंधीमुळे प्राचीन श्रीराम मंदिर व टिळक भाजी मार्केट परिसरातील रहिवासी नागरिक जॅम कंटाळून गेले असल्याने तेथील रहिवासी नागरिक श्रीराम मंदिरातील कार्यक्रमात सामील होणाऱ्या नामवंत लोकांना हाताशी धरून नेते मंडळी असो राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असो आलेल्या अतिमहत्वाच्या प्रत्येक पाहुण्यांना टिळक चौक वर्धा येथील भाजी मार्केट परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या लगत असलेल्या विदारक परिस्थिती बाबत त्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याचा बंदोबस्त करावा याबाबत विनवणी करीत असतात शेवटी नेहमी नेहमी सर्वांना सांगून सांगून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून थकून गेल्याने तेथील परिसरातील काही बुद्धिजीवी लोकांनी व श्रीमंत व्यावसायिकांनी 31 वर्षांपासून निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या आम्हा पट्टेवार दाम्पत्याचा हात धरला व तेथील वास्तविक परिस्थिती विषद केली असल्याने वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर विषय कायमचा सुटावा यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न

      वर्धेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दोन वेळा सौंदर्यीकरण करण्यात आले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करीत असतांना पुतळ्यापेक्षा लोखंडी जिना चुकीच्या पद्धतीने बांधल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करतांना घोड्याला हार अर्पण करावा का ? अशी परिस्थिती त्या ठिकाणी पहायला मिळते आहे त्यासोबतच सदर ठिकाणी लाखो रुपये खर्च करून फाउंटन चे बांधकाम करण्यात आले परंतु संबंधित ठेकेदार हा नागपूरचा असून त्याला हे सुद्धा माहीत नाही की फाउंटन चे बांधकाम करण्यापूर्वी पाण्याचं स्तोत्र निर्माण करावं लागते ठेकेदाराने पाण्याची व्यवस्था केली नसल्याने नेहमी तेथील फाउंटन बंद असते ही बाब वर्धेकरांच्या लक्षात येताच फाउंटन नेहमीच बंद का असतो फाउंटन शोभेकरता लावले का ? अशाप्रकारे जनतेकडून तक्रारीचा वाढता ओघ लक्षात घेऊन वर्धा नगरपालिकेच्या वतीने फाउंटन सुरू राहावे यासाठी 24 तासाकरिता त्या ठिकाणी नळाचे कनेक्शन देण्यात आले परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यास संबंधित ठेकेदारास भाग नाही पाडले यावरून स्पष्ट दिसून येते की ठेकेदाराने नेमके काय काम केले काम घेणे कमिशन वाटणे व स्वतःही मालामाल होणे व मोकळे होणे इतकेच

         या निवेदनाद्वारे आपणांस नम्र विनंती करण्यात येते की वर्धेतील प्राचीन श्रीराम मंदिरा समोरील टिळक चौकातील गोल बाजार भाजी मार्केट परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या लगत असलेले कचऱ्याचे ढीग ताबडतोब उचलावे व आतील भागात नेहमीसाठी साफसफाई ठेवावी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरना साठी केलेला लाखो रुपयांच्या खर्चाचा हिशोब तपासावा व आतील भागात प्रसाधन गृहासाठी आलेला निधी कुठे खर्च केला याची सुद्धा शहानिशा करावी व यापुढे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या लगत व सदर परिसरात कोणीही सडका भाजीपाला व कचरा टाकणार नाही कोणीही खुलेआम उघड्यावर लघुशंका करणार नाही सदर ठिकाणी खुलेआम दारूविक्री होणार नाही बेकायदेशीर धंदे दिसणार नाही या दृष्टीने प्रामाणिक विचार करून वरील सर्व सार्वजनिक बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करून त्वरित न्याय देण्याचे करावे ही नम्र विनंती सादर*

*प्रतिलिपी,*

*1) मा जिल्हाधिकारी महोदया*

       *श्रीमती वान्मथी चंद्रमोहन*

       *जिल्हाधिकारी कार्यालय*

       *वर्धा*

                  *सहकार्याची अपेक्षा धन्यवाद*

                                *आपले नम्र*

         रंजना सुरेश पट्टेवार नगरसेविका तथा सभापती भाजपा,राष्ट्रसेविका समिती सदस्या,स्थायी समिती सदस्या,रुग्ण कल्याण समिती सदस्या,सुदामपुरी प्रभाग क्रमांक 4 नगर परिषद वर्धा

          श्री सुरेश पट्टेवार ज्येष्ठ समाजसेवक, स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केशव प्रभात शाखा वर्धा,अध्यक्ष शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना जिल्हा वर्धा,सदस्य सक्षम संघटना जिल्हा वर्धा,सल्लागार संगीत कलोपासक संघ जिल्हा वर्धा,अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका वर्धा,सदस्य मंडल रेल उपयोगकर्ता सलाहकार समिती नागपूर,भाजपा कार्यकारिणी सदस्य वर्धा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये