ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे दि. २/७/२०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय परिसरातील संभाव्य धोके लक्षात घेऊन तसेच नैसर्गिक आपत्तीची माहिती देऊन सुरक्षा साधनांद्वारे आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे तसेच आपल्या भोवतालच्या परिसरात आग लागल्यावर मुलांनी कसे सतर्क राहावे, स्वतःचे व सहका-यांचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी विकास शहाकार, सब ऑफिसर अग्निशमन महानगरपालिका, चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यात जिज्ञासापूर्वक सहभाग घेत दिलेल्या सूचनांचे पालन केले व आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे हे जाणून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करणे आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे हा या व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश होता.

   शाळेचे पर्यवेक्षक महेश गौरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्याक्षिक यशस्वीरित्या पार पडले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांंचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये