कंपनीच्या स्कीमद्वारे जमा केलेल्या रक्कमेची मोठ्या व्याजाने परतावा मिळवून देण्याचे आमीष दाखवून गुंतवणूकदाराची फसवणूक
गुंतवणूक रक्कमे संबंधाने पुराव्याचे कागदपत्रासह 7 दिवसात कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 21/03/2011 ते दिनांक 03/01/2017 पर्यतं या कालावधी मध्ये सहयोग बिल्डर अॅन्ड रिअल इस्टेटम प्रा. लि. कार्पोरेट ओळख क्रंमाक U70102MH2009PTC194874 पत्ता-तिरुपती अपार्टमेंट, एच. नंबर 1-24-37, बिसेन नगर, न्यु मोढा जवळ, नांदेड-431602, महाराष्ट्र, या कंपनीमध्ये आर डी., फिक्स डिपॉझोट तसेच माहेवारी पेन्शन योजना इतर स्किममध्ये वार्षीक 12% व्याजाचे आमीष देवून वर्धा, देवळी, हिगंणाघाट, कारंजा, आर्वी, आष्टी, पुलगाव, जिल्हा वर्धा, येथील, नागरीकांनौँ पैसे गुंतविण्याचे आमीष देवून मोठया प्रमाणात रक्कम गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक वेळ संपल्यावर देखील । सहयोग बिल्डर अॅन्ड रिअल ईस्टेटम प्रा. लि., या कंपनीत गुंतवूणकदार पिडीत यांची मोठ्या प्रमाणात गोळा केलेली रक्कम 1,11,62,286 रु परत न करता कंपनी कार्यालये बंद करुन अपहार करुन फसवणुक केल्याने सदर आरोपी 1) सुरेद्र प्रसांद विश्वकर्मा 2) हेमलता सुरेद्र विश्वकर्मा हेमलता निवृत्ती जावध 3) सुनिल निवृत्ती जावध 4) सोपान नामदेव खंडारे तसेच मुख्य आरोपी खुशाल पंढरी बारापात्रे, वय 37 वर्ष, रा. नवीन वस्ती बुटीबोरी जिल्हा नागपूर
ह. मु. जाम तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा, इतर साथीदार विरुध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर जि. वर्धा येथे अपराध क्रंमाक 18/2017 कलम 420, 504, 506, 34 भा. द. वी. सहकलम 3, एमपीआयडी नुसार गुन्हा नोंद असून सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथे मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा वर्धा पुंडलिक भटकर यांचे मार्गदशनात पोलीस उपनिरीक्षक शांताराम मुदमाळी, व त्यांचे सहकारी अमंलदार आर्थिक गुन्हे शाखा वर्धा करीत आहेत.
तरी याव्दारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, वरील कंपनीमध्ये ज्या-ज्या नागरीकांनी रक्कम गुतंवणूक केलेली असेल व आजपर्यंतं परतफेडीचे फॉर्म भरुन दिलेले नसतील, अशा सर्व नागरीकांनी आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथे नागरीकांकडे उपलब्ध असलेल्या गुंतवणूक रक्कमे संबंधाने पुराव्याचे कागदपत्रासह 7 दिवसात कार्यालयीन वेळेत येवून सादर करावे.