अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपी ताब्यात
गुन्ह्यातील ४ लाख ६७ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ०५.०५.२०२५ रोजी दुपारी १२.०० वा. ते १६.०० वा. दरम्यान फिर्यादी सौ. पल्लवी समीर भलमे रा. सेलु या त्यांचे परीवारासह कार्यक्रमाकरीता गेले असता कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे घराचे कुलुप तोडुन आलमारीमधील १) १० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र कि. ३५,००० रु., २) ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके कि. १२,००० रु., ३) २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी कि. ८००० रु., ४) १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ कि. ४००० रु., ५) ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र कि. १२,००० रु., ६) १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ कि. ५२,५०० रु., ७) चांदीची चैन कि. ५०० रु., ८) चांदीचे लॉकेट कि. २०० रु., ९) चांदीचे हातातील कडे कि. ५०० रु., १०) चांदीची जिवती कि. १०० रु., ११) रोख रक्कम २०,००० रु. असा एकुण जु.कि. १,४४,८०० रु. चा माल चोरुन नेला. अश्या फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन सेलु येथे अप.क्र. ४५०/२०२५ कलम ३३१(३), ३०५(अ) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक तपास करुन दि. ०९.०५.२०२५ रोजी वर्धा जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरफोडी संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाली कि, एक संशयित इसम जाम तालुका समुद्रपूर येथे राहत आहे. अशा खबरेवरून जाम येथे पोहोचून त्यास ताब्यात घेऊन तो किरायाने राहत असलेल्या रूमवर गेलो असता त्याचे रूमवर घरफोडीचे साहित्य व पो. स्टे. सेलू येथील चोरी गेलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने त्याला विश्वासात घेवुन गुन्ह्या संबंधाने अधिक विचारपुस केली असता आरोपीने खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली.
१) पो.स्टे. सेलू येथील अप. क्र. ४५०/२०२५ कलम ३३१(३), ३०५ बि.एन.एस. २०२३
२) पो.स्टे. सेलू येथील अप. क्र. ४१३/२०२५ कलम ३३१(३), ३०५ बि.एन.एस. २०२३
३) पो.स्टे. समुद्रपूर येथील अप. क्र. १७७/२०२५ कलम ३३१(३), ३०५ बि.एन.एस. २०२३
४) पो.स्टे. समुद्रपूर येथील अप. क्र. २६६/२०२५ कलम ३३१(३), ३०५ बि.एन.एस. २०२३
५) पो.स्टे. समुद्रपूर येथील अप. क्र. ४२८/२०२५ कलम ३३१(३), ३०५ बि.एन.एस. २०२३
६) पो.स्टे. हिंगणघाट येथील अप.क्र. ३३४/२०२५ कलम ३०३(२), ३३१(३) बि.एन.एस. २०२३
७) पो.स्टे. हिंगणघाट येथील अप.क्र. ४१५/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३) बि.एन.एस. २०२३
८) पो.स्टे. हिंगणघाट येथील अप.क्र. ५००/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३) बि.एन.एस. २०२३
९) पो.स्टे. हिंगणघाट येथील अप.क्र. ६९३/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३) बि.एन.एस. 2023
१०) पो.स्टे. गिरड येथील अप. क्र. ४८/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३) बि.एन.एस. २०२३
११) पो.स्टे. सिंधी (रेल्वे) येथील अप.क्र. ८६/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३) बि.एन.एस. २०२३
१२) जिल्हा नागपूर पो.स्टे. बेला नागपूर ग्रामीण येथील अप.क्र. ७४ /२०२५ कलम ३३१(३), ३०५ बि.एन.एस. २०२३
१३) जिल्हा नागपूर पो.स्टे. बेला नागपूर ग्रामीण येथील अप.क्र. ७७/२०२५ कलम ३३१(३), ३०५ बि.एन.एस. २०२३
वरील प्रमाणे नमूद १३ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने मौका जप्ती पंचनाम्या प्रमाणे व आरोपीने इतर दोन साथीदार १) कमलेश उर्फ महाराज हिरामण नगराळे, २) सुमेध उत्तम उंबरे, दोन्ही रा. वरोरा जि. चंद्रपूर यांचे मदतीने वरोरा येथे सोने व चांदीचे दागिने विकले असल्याचे सांगितल्याने त्यांचे कडून सुद्धा गुन्ह्यातील मुद्देमाल १) एकूण ११ गुन्ह्यातील पिवळ्या धातूचे ११७ ग्रॅम वजनाचे दागिने किं. ४,५७,९५० रू, २) एकूण ११ गुन्ह्यातील पांढऱ्या धातूचे ९० ग्रॅम वजनाचे दागिने किं. ८६००/- रू, ३) एक मोबाईल जिओ भारत कंपनीचा किं. १००० रू, ४) एक घरफोडी करण्याकरिता वापरण्यात येणारा लोखंडी सळाख (टॉमी) किं. १०० रू, ५) एक पेचकस किं.१०० रू असा एकूण जु. किं ४,६७,७५० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ . सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोनि. विनोद चौधरी, पोउपनि प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल, राहुल लुटे व सायबर सेल, वर्धा येथील दिनेश बोथकर, अनुप कावळे, विशाल मडावी, अंकित जिभे यांनी केली आहे.