ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नोकारी येथे पुस्तकं दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कडून जवळ पासच्या शाळेत मुलांकरिता नव नवीन उपक्रम राबविले जातात, त्यात जागतिक पुस्तकं दिवसाचे औचित्य साधून सीएसआर अंतर्गत जिल्हा परिषद शाळा नोकारी येथे कार्यक्रम घेण्यात आलात.

या कार्यक्रमाला नोकारी गावचे सरपंच मनीषा पेंदोर, मुख्याध्यापक विनायक राठोड, शिक्षक बाबुराव राठोड, सुभाष पिंपळशेंडे व नामदेव पवार तसेच वर्ग 2 री ते 7 वीचे एकूण 59 विध्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विध्यार्थी यांची वाचन स्पर्धा घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेत, सरपंच नोकारी मनीषा पेंदोर व शिक्षक वर्गाकडून पुस्तकं वाचनाचे फायदे सांगत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेत.

पुस्तक वाचनाने मानवाचे चांगले जीवन घडू शकते व वेगवेगळ्या पुस्तकाचा संग्रह घरी व शाळेत असणे आवश्यक आहेत हे माणिकगड सी एस आर अंतर्गत सांगण्यात आलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये