आयुध निर्माणी वसाहतीत रोगनिदान तथा रक्तदान शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मजदूर तथा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मजदूर व महाराष्ट्र दिवस समारोह समितीतर्फे आयुध निर्माणी वसाहतीतील रुग्णालयात रोग निदान तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे वसाहतीत रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले.
सदर शिबिराच्या उद्घाटन समारंभाला आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक प्रवीण कुमार पांडेय, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर टी.शिवा रेड्डी आदींची उपस्थित होती. शिबिरात मिडास हॉस्पिटल नागपूर द्वारा अत्याधुनिक मशीन द्वारा कर्मचाऱ्यांचे निशुल्क रोग निदान करण्यात आले. तर रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी रक्तदान केले. रक्त संकलनाकरिता आयुष ब्लड बँक नागपूर यांनी सहकार्य केले.
सदर शिबिराला यशस्वी करण्यासाठी तारकेश्वर पांडे, देवेंद्र लखावत, संदीप वारजुरकर महेश ढेंगळे, प्रमोद लाडसे,गणेश पढाल,मुकेश विश्वकर्मा, अनिकेत वाकडे,गजानन तुरीले, अमोल हनुमंते आदींनी सहकार्य केले.