सावली तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीवर महिला राज
ईच्छुकांच्या स्वप्नावर पाणी ; अनेकांचा अपेक्षाभंग ; महिलांना मिळणार संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण चिठ्ठीद्वारे नुकतेच तहसील कार्यालयातील सभागृहात काढण्यात आले. या आरक्षणावरून विविध प्रवर्गातील २८ महिलांना सरपंच पदावर विराजमान होता येणार आहे. तर २६ ग्रामपंचायतीवर पुरुषांना आरक्षित सरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर पुन्हा महिला राज येणार असल्याचे या आरक्षण सोडतीवरून दिसून आले आहे. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे आरक्षण निघाले नसल्याने बारशिंग बांधुन असलेल्या ईच्छुकांचा हिरमोड झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयातील सभागृहात चिठ्ठी द्वारे काढण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त महिलांना संधी मिळालीआहे.
सर्वसाधारण स्त्री करिता सरपंच पदासाठी आरक्षित १४गावे आहेत.
यात बोरमाळा,चारगाव,कढोली, विहिरगाव,चिखली, उसरपार चक,पालेबारसा,मुंडाळा,खेडी, निलसनी पेठगाव,डोंगरगाव मस्के,चांदलीबूज, गायडोंगरी, कसरगाव, आदी गावाचा समावेश आहे.
नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री-६ गावे
यात पेंढरी मक्ता, सायखेडा, मेहाबुज,जांबबुज,बोथली, लोंढोली, आदी गावाचा समावेश झाला आहे.
अनुसूचित जाती स्त्री-३ गावे
यात अंतरगाव,चीचबोडी, निमगाव आदी गावाचा सामावेश झाला आहे.
अनुसूचित जमाती स्त्री राखीव-५ गावे
यात बेलगाव,जीबगाव,व्याहाड बूज, मोखाळा, करोली आदी गावाचा समावेश झाला आहे.
नागरिकांचा मागासप्रवर्ग -६
यात गेवराबुज, पाथरी, डोनाळा माल,उपरी व्याहाड खुर्द, उसेगाव,
सर्वसाधारण आरक्षित-१३ गावे
यात चकपिरंजी,नवेगाव तुकुम,हिरापूर, केरोडा,मंगरमेंढा, गेवराखुर्द,कापसी, घोडेवाही, हरांबा, करगाव चक, साखरी, सोनापूर, कोंडेखल आदी गावाचा समावेश झाला आहे.
अनुसूचित जाती राखीव-३गावे
यात कवठी, आकापूर, सामदाबूज, आदी गावे
अनुसूचितजमाती आरक्षित-४ गावे
यात पारडी, वाघोली बुटी, निफंद्रा, थेरगाव आदी गावाचा समावेश झाला आहे. हे सरपंच पदासाठी आरक्षण२०२५ते२०३० पर्यंत कालावधीत राहणारआहे.त्यामुळे अनेकांना आतापासूनच ईच्छुक कामाला लागले असल्याचे पाहावयास मिळतेआहे.
यावेळी प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे, निवासी नायब तहसीलदार किशोर मडावी,नायब तहसीलदार संदीप चांदेकर, निवडणूक लिपिक लक्ष्मीकांत बलसुरे, दत्तात्रय तुंकलवार,सुनिल शेंडे, तुषार कावळे,पंकज वाढ ई,तसेच तहसीलचे कर्मचारी वर्ग आणि गावकरी वर्ग उपस्थित होते.