ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुनील बावणे (नील) यांना साहित्य पुष्प पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : येथील कवी गझलकार सुनील बावणे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “स्याडा कोठसा भरते” या बोलीभाषेतील काव्य साहित्यकृतीला ललित कला फाउंडेशन, ठाणे या प्रतिष्ठित संस्थेचा ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे.

सुनील बावणे हे बल्लारपूर येथे कार्यरत असून ते मराठी प्रमाण भाषेसोबत पूर्व विदर्भात बोलल्या जाणाऱ्या झाडीबोली भाषेत कवीता, गझल लिखाण करीत असतात. काही निवडक बोली भाषेत लिखाण करणाऱ्यांपैकी सुनील बावणे हे एक उत्तम कवी लेखक आहेत. नुकताच त्यांच्या प्रकाशित झालेल्या ” स्याडा कोठसा भरते ” या काव्य साहित्यकृतीस पुरस्कार जाहीर करण्यात आला असून होणाऱ्या दोन दिवसीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे व गझल सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती ललित कला फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप कारखानीस यांनी एका पत्रकान्वये दिलेली आहे.

सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ३ व ४ मे रोजी के. आ. बांठिया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे ललित कला फाउंडेशन ठाणे व पुस्तकाचं घर शेगांव ( बु.) यांचे वतीने करण्यात आलेले आहे. या दोन दिवसीय सोहळ्यात सुनील बावणे यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक साहित्य संस्थांतर्फे कवी गझलकार सुनील बावणे यांचे कौतुक होत असून ही बाब चंद्रपूर वासीयांसाठी अभिमानाची आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये