पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध
तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांसह काही परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 30 पर्यंत पोहोचला आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या निरपराध लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष केले. या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 30 पर्यंत पोहोचला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असून संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक तहसील कार्यालय येथे एकत्रित येऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात नारेबाजी करत सदर घटनेचा तीव्र निषेध केला.दरम्यान तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यात त्या आठवणीने सुद्धा थरकाप आला पाहिजे. आशा संतप्त भावना निवेदनाद्वारे निषेधकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे, माजी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर जाधव, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, माजी सभापती हरी शेटे, रंगनाथ कोल्हे,माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, महेश देशमुख, माजी सभापती गजानन पवार, गणेश बुरकुल, शिवसेनचे वसंत आप्पा खुळे, पवन झोरे, गणेश सवडे, विलास खराट, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड, मंगल अंभोरे, दत्ता टकले, रमेश नरोडे, गजानन तेजनकर, दिनकर देशमुख, नामदेव मुंडे, बबन कवळे, राम कापसे आदी उपस्थित होते.