ऑपरेशन शोध मोहीम दरम्यान अल्पवयीन मुलीस व पळवून नेणाऱ्या आरोपीस गुजरात राज्यातील सुरत येथुन ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
यातील फिर्यादी यांनी दि. 09/06/2024 रोजी पोलीस स्टेशन सेलु येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 16 वर्षे हिला दि.07/06/2024 रोजी दुपारी अंदाजे 02/00 वा.दरम्यान संशईत आरोपी नामे राहुल रवी चव्हाण रा. पाचोड ता. आर्वी याने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सेलु येथे अप क्र. 516/2024 कलम 363, 370 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास दि. 19/03/2025 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचेकडे वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्यात मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक सा. वर्धा तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक पथक तयार करण्यात आले.
गुन्हयात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून यातील आरोपी याचा शोध घेण्याचे अनुषंगाने यातील आरोपी नामे राहुल रवि चव्हाण वय 24 वर्ष, रा. पाचोड ता. आर्वी जि. वर्धा त्यांचे शोधकामी पथक नेमुन योग्य त्या सुचना देऊन गुजरात राज्यातील सुरत येथे दिनांक 17/04/2025 रोजी आरोपी व पिडीतचा शोधकामी पाठवण्यात आले. सदर पथक यांनी सलग 3 ते 4 दिवस अथक परिश्रम करुन पिडीत मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस व यातील अल्पवयीन पिडीत मुलीस गुजरात राज्यातील सुरत येथुन ताब्यात घेऊन पिडीत व आरोपीस रीतसर कायद्याप्रमाणे पोलीस स्टेशन सेलु यांचे ताब्यात देण्यात आले.असून पुढील तपास पोलीस स्टेशन सेलु करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सा. , अप्पर पोलीस अधीक्षक श्री डाॅ. सागर कवडे सा. यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा आणि पो.हवा. अक्षय राऊत, गोविंद मुंडे सायबर सेल वर्धा यांनी केली.