ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत ३० एप्रिलला अ‍ॅड.सचिन मेकाले यांचे व्याख्यान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महात्मा फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ. आंबेडकर, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती जिवती यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्य होणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन ३० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, विचारवंत व साहित्यिक अ‍ॅड.सचिन मेकाले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अ‍ॅड.सचिन मेकाले हे मुळचे जिवती तालुक्यातील शेणगांव येथील आहेत. अ‍ॅड.सचिन मेकाले हे मागील १५ वर्षापासून पुरोगामी चळवळीत सक्रिय असून त्यांचा आंबेडकरी चळवळप्रती व महापुरुषांच्या जीवनावर गाढा अभ्यास असुन ते सबंध देशभर प्रबोधनानिमित्य फिरत असतात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अ‍ॅड.सचिन मेकाले तर उद्घाटक म्हणुन माजी आमदार सुभाष धोटे आणि विशेष अतिथी म्हणुन आमदार देवराव भोंगळे यांची उपस्थिती राहील. सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे अवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये