नागरिकांच्या नळाला दूषित पानी!
काँग्रेस तर्फे बेशरमची झाडे लावून नगरपरिषदेचे निषेध
चांदा ब्लास्ट
घुग्घूस : औद्योगिक नगरीत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे सध्या संपूर्ण शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून नागरिकांत नगरपरिषद विरोधात प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे.
नगरपरिषदेच्या वतीने घरगुती नळ चार ते पाच दिवसात एकदा येत असतात त्यात ही नळाला धार येत नाही.
बहिरम बाबा नगर येथील नागरिकांच्या नळाला सतत घाणेरडे व दूषित पानी येत असल्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेला दोन महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली
मात्र नगरपरिषदेने या गंभीर समस्याकडे दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 20 एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सदर खड्ड्यात बेशरमची झाडे लावून नगरपरिषदेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, सुनील पाटील, दिपक पेंदोर, अभिषेक सपडी, दिपक कांबळे, निखिल पुनघंटी,कपिल गोगला, शहशाह शेख, सुरज मिश्रा, नागेश कुचनकर, मनोज चांदेकर,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते