ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानोली गांवात घरेलू आग सुरक्षा मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कडून आपल्या सीएसआर अंतर्गत गावाकऱ्यांचा चारीही बाजूनी विचार केला जात आहेत.वाढते ऊन व त्यापासून होणारे दुष्परिणाम तसेच काही दिवसा अगोदर मानोली गांवातील शिवारात लागलेली आग हे लक्षात घेत, यावेळेस माणिकगड सीएसआर कडून “युनाइटेड टू इगनाईट अ फायर सेफ इंडिया” या मासिक सुरक्षा थीमवर अग्नि सुरक्षा अभियान अंतर्गत ऍडमिन प्रमुख माणिकगड सिमेंट, श्री नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनात लागून असलेल्या मानोली गांवात घरेलू आग सुरक्षेवर्ती मार्गदर्शन करण्यात आलेत.

हे मार्गदर्शन मानोली गांवाच्या मध्यभागी,माणिकगड च्या अग्नी सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे द्वारे प्रात्यक्षिका द्वारे देण्यात आलेत तर सुरक्षा प्रश्न मंजुषा घेऊन गांवकऱ्यांना पारोतोषिक देण्यात आलेत.

यावेळी मानोली गांवातील पुरुष, महिला व शाळेतील विध्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
मानोली गावाचे उपसरपंच गणेश नैताम यांनी बोलतांणि सांगितले कि गेल्या काही दिवसापासून माणिकगड सिमेंट आसपासच्या गांवात नव नवीन उपक्रम राबवत आहेत व त्याचा आम्हा गांवकऱ्यांना चांगला फायदा होत आहेत, या मार्गदर्शनाने आम्ही आग लागू नये व लागल्यास काय उपाययोजना करावी हे समजून घेतले.

तर मानोली शाळेतील शिक्षक वर्गानी माणिकगड च्या सी एस आर टीम सोबत मिळून या उपक्रमाला यशस्वी करण्यास प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये