ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.आर.आय.एल. कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात?

जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी खेळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कंत्राटदार जीआरआयएल कंपनीचे अनेक कारणे चर्चेत असताना आता या कंपनीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे कारस्थान रचले आहे खिर्डी या ठिकाणी असलेले शौचालय व सांडपाणी टँकरमध्ये भरून राष्ट्रीय महामार्गाच्या आसन शिवारातील छोट्या नाल्यांमध्ये आज सकाळी सोडल्यामुळे परिसरात दुर्गंधी वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे एवढेच नव्हे तर आसन शिवाराच्या छोट्या ना आल्यावर सोडलेल्या घाणपाणी मुळे पाणी नाल्यामध्ये साठवून पाळीव प्राणी गाय बैल जनावरे तुष्णा भागविण्यासाठीकेल्यास जनावरे दगावण्याची शक्यता बडकावली आहे.

अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे चर्चेत असताना या भागातील खेरडी येथे कॅम्प असलेल्या जी आर आय एल कंपनीने पूर्वी उन्हाळ्यामध्ये थ्रीडी गावात प्रदूषणाने नागरिक त्रस्त असताना वर्षभरातील टॅंक मध्ये असलेलं ध्यान पाणी आरोग्याला घातक असल्याने हे वाहनाद्वारे आसन नाल्यामध्ये सोडून लोकांच्या जीवाशी जीआरएल कंपनीने मुजोरीने राष्ट्रीय काम म्हणून लोकांची दिशाभूल करीत अवैध उत्खनन सांडपाण्याची दुर्गंधी असे अनेक कारणामे करीत असल्यामुळे नागरिकांनी या कंपनीच्या कृत्याचा निषेध करीत असून प्रशासनाला हाताशी धरून नियमबाह्य कारभार या कंपनीने या क्षेत्रात उभारला आहे.

यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून आरोग्य खात्याने तातडीने दखल घेऊन आसन शिवारातील साचलेले दूषित पाणी तात्काळविलेवाट करावी व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये