ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती  निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक,राजनीतिक आर्थिक व शैक्षणिक विचार या बद्दल  जागरुकता निर्माण करण्यासाठी व संविधानाची ७५ वर्षे  यावर आढावा  घेण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात डॉ. बाबसाहेब आंबेडकर  यांच्यावर आधारित व त्याच्या विचारांच्या   विविध  विषयांच्या पुस्तकांचे  ग्रंथप्रदर्शनी  लावण्यात आली.

यामध्ये  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान,सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महिला आरक्षण एव भारतीय समाज, भारत में जाती व्यवस्था अश्या अनेक प्रकारची पुस्तके समाविष्ट होती. तसेच,“भारतीय संविधानाची ७५ वर्षे” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.त्यात वैष्णवी गुरनुले हिने  प्रथम क्रमांक व यश भैसारे याने द्वितीय क्रमांक पटकावला .तसेच  डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत आशाली मोहुर्ले प्रथम व यश भैसारे याने द्वितीय क्रमांक पटकावला.

 प्रश्नमंजुषा या स्पर्धेत  प्रतीक्षा राऊत प्रथम क्रमांक,रसिका मोहुर्ले द्वितीय क्रमांक आणि आचल गुडडलवार हिने तृतीय क्रमांक पटकाविला.सर्व स्पर्धांचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.स्मिता राऊत व  सदस्य डॉ. रामचंद्र वासेकर,डॉ.किरण कापगते, प्रा .महानंदा भाकरे यांनी केले.या सर्व स्पर्धा महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य माननीय डॉ.अशोक खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये