ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रत्येक दिवसाची सुरुवात व्यायामापासून व्हावी – डॉ लक्ष्मीकांत लाडूकर

स्व.किसनलालजी भैया स्मृती व्याख्यानमाला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ‘आज अनेकांकडे पैसा आहे पण आरोग्य जपण्यासाठी वेळ नाही.जोपर्यंत आपण जीवंत आहोत तोपर्यंत आपण मिळविणार, पण सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य आहे.नियमित व्यायाम  आरोग्य जपण्यासाठी करावे.प्रत्येक माणसाने खूप चालले पाहिजे,धावलं पाहिजे, शारिरीक व मानसिक आरोग्य पाळलं पाहिजे.तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही व्यायामापासून करणे गरजेच आहे.’असे महत्वपूर्ण विवेचन ब्रह्मपुरीतील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मीकांत लाडूकरांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात स्व.किसनलालजी भैया स्मृती व्याख्यानमालेत उद्घाटनप्रसंगी वक्ते म्हणून ‘हाऊ टू किप यूवरसेल्फ फिट’ या विषयावर बोलत होते.

     या व्याख्यानमालेचे उद्घाटन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयांनी केले.अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.डी. एच. गहाणे होते तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. भाऊसाहेब जगनाडे, उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर, कनिष्ठ महाविद्यालय संचालक प्रा.विनोद नरड, प्रभारी डॉ. वर्षा चंदनशिवे इ.मान्यवर उपस्थित होते.उद्घाटकिय मनोगतात अशोक भैया म्हणाले, ‘व्याख्यानमालेमुळे येथे अनेक वक्ते घडतात. आपल्या महाविद्यालयाची परंपरा आहे की वैचारिक मेजवानीसाठी नविन,नविन व्याख्यान आयोजित करणे आणि वेळेचा सदुपयोग करून घेणे’ असे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गहाणेंनी,दरवर्षी होणारी ही व्याख्यानमाला कोरोना काळात खंड पडली होती ती आपण सुरु करुन नविन वक्ते निर्मितीला चालना देत आहोत,असे विचार मांडले.

      प्रस्ताविक प्रभारी डॉ. वर्षा चंदनशिवेनी,संचालन प्रा. मनिषा लेनगुरेंनी तर आभार प्रा.परिमल मेंगरेनी केले.कार्यक्रमाला समस्त प्राद्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व शहरातील रसिक श्रोते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये