ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावलीच्या ग्रामीण रुग्णालयाची धुरा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

    सावली ग्रामिण रुग्णालयात मागील अनेक दिवसापासुन एकच वेद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होत आहे. मात्र अशा गंभीर बाबीकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात असुन आरोग्य सेवा ही वेंटीलेटरवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सावली तालुक्यात 111 गावे असुन 6 प्राथमिक आरोग्य केंद्र व सावली मुख्यालयी ग्रामिण रुग्णालय आहे. तालुक्याच्या परिसरातील अनेक रुग्ण उपचाराकरीता सावलीचे ग्रामिण रुग्णालयात येत असतात. या ग्रामिण रुग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षक व तीन वेद्यकीय अधिकारी अशी पदे असतांना मात्र सध्या या रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधिक्षक असुन एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णालयाचा संपूर्ण भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आलेला आहे. याचा फटका रुग्सेारवेला बसत असुन योग्य प्रमाणात रुग्णांना रुग्णसेवा मिळत नसल्याची ओरड आहे. तर आरोग्य प्रशासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामिण रुग्णालयात काम करण्याची तंबी दिल्याने तालुक्यातील शाळा तपासणी कार्यक्रम हा ठप्प अवस्थेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या वातावरणामध्ये मोठया प्रमाणात बदल झालेला असुन कधी उन तर कधी पाऊस अशी परिस्थिती असल्याने याचा मोठा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. तर उन्हाच्या दाहकतेने उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे परिसरातील रुग्ण उपचाराकरीता सावली येथील ग्रामिण रुग्णालयात येत आहेत. परंतु योग्य रुग्णसेवा मिळत नसल्याने गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागत असुन आर्थिक अडचणीमध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तात्काळ सावलीचे ग्रामिण रुग्णालयात रिक्त असलेल्या जागेवर प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी सावली तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.

    सावलीचे ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याची पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपूरावा करण्यात येत असुन लवकरच रिक्त असलेल्या जागेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत.

डॉ. बंडु रामटेके, प्रभारी वै.अ. ग्रा.रु. सावली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये