ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चला मतदान करू या! यावर रांगोळी स्पर्धा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता लोकांमध्ये जनजागृती अभियानांतर्गत स्थानिक एस.एस.एन.जे. कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे ‘चला मतदान करू या!’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन 24 एप्रिल रोजी एन.सी.सी. हाॅल मध्ये करण्यात आले. यात 20 मुलामुलींनी भाग घेऊन रांगोळीतून जनजागृती केली.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी तथा एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर, परीक्षक प्रा. डॉ. निलिमा बर्गट व प्रा. जगदीश यावले उपस्थित होते.

 

रांगोळी स्पर्धेत प्रथम पुरस्कार कॅडेट अस्मिता दडांजे व कॅडेट अनुश्री खंडरे यांना तर द्वितीय पुरस्कार कॅडेट कोमल शितळे व तृतीय पुरस्कार कॅडेट रविना मून यांना देण्यात आला. प्रोत्साहनपर पुरस्काराचे मानकरी कॅडेट अपेक्षा नेवारे व प्रतिक्षा पाटमासे या ठरल्या.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन सार्जंट साक्षी येळणे हिने तर आभार रासेयो स्वयंसेवक आकाश कन्नाके याने मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये