ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माहेश्वरी महिला मंडळच्या अध्यक्षपदी श्रीमती. अलका गिरीश चांडक

तर सचिवपदी श्रीमती. रानी राजेश काकानी तर कोषाध्यक्षपदी श्रीमती पायल प्रवीण सारडा

चांदा ब्लास्ट

नुकत्याच झालेल्या माहेश्वरी महिला मंडल समाजाच्या बैठकीमधे अध्यक्षपदी श्रीमती. अलका गिरीश चांडक, सचिवपदी श्रीमती. रानी राजेश काकानी तर कोषाध्यक्षपदी श्रीमती. पायल प्रवीण सारडा हे सर्व सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली.

या प्रसंगी समाजातील माजी महिला पदाधिकारी उपस्थित होते. यामधे श्रीमती. सुनीता जी सोमानी, श्रीमती.ललिता जी काबरा, श्रीमती. हेमलता जी सोमानी, श्रीमती. आनंदी जी सारडा, श्रीमती. सुचिता जी राठी, श्रीमती. राधिका जी मुंधड़ा तसेच माजी अध्यक्ष श्रीमती. इंदुजी जाजू यावेळी उपस्थित होते.

श्रीमती. अलका गिरीश चांडक या माहेश्वरी महिला मंडळाच्या मागील कार्यकारिणी मध्ये सचिव पदावर कार्यरत होते. माहेश्वरी महिला मंडळ, चंद्रपूर हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. माहेश्वरी महिला मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम, शैक्षणिक, विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविले जातात.

माहेश्वरी समाजातील विविध संघटनांतर्फे श्रीमती. अलका गिरीश चांडक यांचे माहेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्ष झाल्यामुळे अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये