ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे “विल्यम शेक्सपिअर” यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे दिनांक 23 ला इंगजी साहीत्यतील जगप्रसिद्ध लेखक,नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची जयंती ही “इंग्लिश डे” म्हणून मोठया उत्स्फूर्त पणे उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या तथा मुख्याध्यापीका प्रा. स्मिता अनिलराव चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री. अनिल काकडे, उप प्राचार्य प्रा प्रफुल्ल माहूरे, केंदप्रमुख श्री. पंढरीनाथ मुसळे, व पर्यवेक्षक श्री शंकरराव तुरणकार यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन श्री माहुरे यांनी या महान इंगजी लेखका बाबत माहिती दिली व इंगजी भाषेचे महत्व पटवून दिले व इंग्रजी भाषा बोलण्याचा सराव कसा करावा याचे अमुल्य मागदर्शन केले. या जयंती निमित्ताने विद्यालयात विध्यार्थ्यां साठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्या मध्ये इंगजी ग्रामर वर आधारित पोस्टर तयार करणे, इंग्रजी ग्रामर वर आधारीत बहुपर्यायी प्रश्नांचा पेपर, व बोधकथा सांगणे या तीन स्पर्धा प्रामुख्याने घेण्यात आल्या या तिन्ही स्पर्धेत बहुसंख्येने विध्यार्थी सहभागी झाले होते.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देखील देण्यात आली. अध्यक्षीय भाषणातुन प्राचार्या. स्मिता अनिलराव चिताडे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले ज्यामध्ये विध्यार्थ्यांना वाचन, लेखन सवय इत्यादी चे महत्त्व लक्षात आणून दिले व सोबतच प्रत्येक विध्यार्थ्यांने दररोज थोडी थोडी प्रगती कशी केली पाहिजे व स्वतः मध्ये कसे बदल घडवून आणले पाहिजे या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. संतोष मुंगूले यांनी केले तर मान्यवर पाहुण्याचे आभार प्रा. विवेक पाल यांनी मानले. सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी, व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये