ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला – विवेक बोढे

घुग्घुस येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट

 येथील मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना विवेक बोढे म्हणाले की, “महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता निर्मूलन, जातिव्यवस्थेचा विरोध आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळेच आज आपण शिक्षणाचा प्रकाश अनुभवू शकतो.”

कार्यक्रमावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, अशोक मंथनवार, उमाकांत आरमुल्ला, रामदास कुळमेथे, रोशन कुळमेथे, नानेबाई मोहितकर, कलावती खामणकर, शीतल खोबरे, सुमन देरकर, उषा ढाक, बंडू निभ्रड, संदीप तेलंग, उमेश दडमल, राकेश उरकुडे, हनुमान खडसे, खुशबू मेश्राम, भारती परते, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे, प्रिया नागभीडकर, किरण बोरुळे, जाई आत्राम आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे करण्यात आले होते. जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला गेला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये