ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचशील बौद्ध विहारात डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला अभूतपूर्व अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव य.आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) किशोर तेलतुंबडे यांच्या व जिल्हा कार्यकारिणी यांच्या नियंत्रण व निरीक्षणाखाली जिवती येथील पंचशील बौद्ध विहारात १३ एप्रिल रवीवरला एकूण ३६ विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ ते ७, इयत्ता ८ ते १०, इयत्ता ११ ते १२ व खुला वर्ग उपासक उपासिकांसाठी अशा चार गटानिहाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरू बुद्ध कबीर फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण – मी बुध्द धम्मच का स्विकारला? अशा गटनिहाय विविध विषयावर राज्यस्तरीय बोधिसत्व धम्म ज्ञान परीक्षेत सहभागी होऊन ज्ञानाचे महामेरू, प्रज्ञासूर्य, सिम्बॉल ऑफ नॉलेज, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला त्यांना अभूतपूर्व अभिवादन करण्यात आले.

      पंचशील बौद्ध विहारात झालेल्या राज्यस्तरीय बोधिसत्व धम्म ज्ञान परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे यांनी जबाबदारी सांभाळली. परीक्षेच्या यशस्वितेसाठी भारतीय बौद्ध महासभाचे शहर सरचिटणीस शरद वाटोरे, तालुका सरचिटणीस चंदू रोकडे, सचिव (संरक्षण विभाग) संकेत भगत व तालुकाध्यक्ष दिपक साबने यांनी अथक परिश्रम घेतले.

     जिवतीसह महाराष्ट्र राज्य व मुंबई प्रदेश अंतर्गत येत असलेल्या सर्व जिल्हा व झोन शाखांच्या नियंत्रण निरीक्षणाखाली सर्व तालुका, शहर, ग्राम, वार्ड शाखेतील बौद्ध विहार, कार्यालय तसेच शाळेत राज्यस्तरीय बोधिसत्व धम्म ज्ञान परीक्षेद्वारे हजारोंनी सहभाग घेत (दि.१३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला त्यांना अभूतपूर्व अभिवादन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये