महात्मा फुले समाजासाठी प्रेरनणेचे प्रतीक – सुमित राठोड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- इतिहासामध्ये अशी काही व्यक्तिमत्व असतात ज्यांच्या कार्य आणि संघर्षाने समाजाचा उत्कर्ष होतो.समाजातील अंधश्रद्धा आणि गुलामगिरीला लात मारून क्रांतीचा लढा देणारे महात्मा ज्योतिराव फुले खऱ्या अर्थाने समाजसाठी प्रेरणेचे प्रतीक ठरतात असे प्रतिपादन आर्यभट अकॅडमी चे संचालक सुमित राठोड यांनी प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयाद्वारे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती पर कार्यक्रमात केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे उपस्थित होते.तर, प्रा. सुमित राठोड,प्रा. मनीषा मरस्कोल्हे, प्रा.आकाश चव्हाण,प्रा.श्रीकांत घोरपडे,प्रा. अमोल जाधव,प्रा.स्विटी डांगे, प्रतीक मून, कुंजम शेंडे,अर्चना मुथ्यलवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपास्थिती होती.
पुढे बोलताना सुमित राठोड यांनी महात्मा फुले यांनी अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी तसेच स्त्रियांना व मागास घटकांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी क्रांतिकारक पावले उचलले. त्यामुळे जाती आणि शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाला असे स्पष्ट केले. तर अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारण अशी समाज उपयोगी कार्य हाती घेतली. आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे शस्त्र हाती देत स्त्री शिक्षणाची ज्योती पेटवली. ज्योतिबा फुले यांच्या संघर्षाने व लढ्याने आज समाजामध्ये स्त्री भक्कमपणे स्वतंत्रित उभी आहे.
विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे चालवावा असे त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रा. मनीषा मरसकोल्हे यांनी माहात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री तिखट हिने केले तर आभार प्रतीक मून याने मानले.