ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात छत्रपती शाहु राजे यांचा जयंती सोहळा संपन्न

प्रतिमेचे हारार्पण करुन व पुजन करुन त्यांना मानाचा मुजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सर्वांना समान हक्क देण्यासाठी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु राजे जगांत प्रख्यात झाले. त्यांची जयंती 26 जुन रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बजाज चौक स्थित कार्यालयांत मोठ्या थाटामाटाने साजरी केली. त्यांच्या प्रतिमेचे हारार्पण करुन व पुजन करुन त्यांना मानाचा मुजरा देण्यांत आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, उपाध्यक्ष प्रा. खलील खतिव, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदिप किटे, राष्ट्रवादी किसानसभेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष अनंत भाकरे, अल्प संख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नावेद शेख, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजु वाघमारे, रा.कॉ. शहर अध्यक्ष मुन्ना झाडे, युवक रा. कॉ. चे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय कदम, विधान सभेचे अध्यक्ष मिलिंद हिवलेकर, जिल्हा सरचिटणीस विनय डहाके, जिल्हा उपाध्यक्ष योगेश घोगरे, जिल्हा सरचिटणीस शारदा केणे, एफ. रहेमान (जिल्हा कार्याध्यक्ष) सचिन ठाकरे, सुधिर मुंजेवार, कार्यालयीन सरचिटणीस खोडके, राजेंद्रसिंह गहेरवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये