ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वच्छता मोहिमेला आजपासुन सुरुवात

स्वच्छता मोहिमेत जनहितमंचच्या सदस्यांनी भाग घेतला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नदीमध्ये प्रेतांची राख शिरविल्या जाते. सोबतच मृतांच्या साड्या व कपडे, आज प्रत्येक नदीच्या काठावर कचऱ्यांचा ठिक पडलेला दिसतो. तो उचलण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते.

तो कचरा उचलण्याचे काम जनहित मंच या सामाजिक संघटनेच्या वतिने आज करण्यांत आले. तसेच विविध सामाजिक संघटनेने हिरहिरीने भाग घेऊन एक चांगली सुरुवात केली.

या स्वच्छता मोहिमेत जनहितमंचचे सचिव डॉ. आसमवार, संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष पाटणकर, कोषाध्यक्ष प्रमोद चौधरी, जेष्ठ सदस्य पद्म ठाकरे, दिनेश रुद्रकार वासुदेव कोकाटे, अरुण गालकर, मनोज पारखी रमेश खडगी, नरेश चांडक, अनिल जंगितवार, अविनाश दरणे, मनोज बडगय्या, किशोर इंगळे, दिलिप मेने इत्यादी जनहितमंचच्या सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

पवनार येथील धाम नदिच्या काठावरील घाण साफ करण्याची मोहिम आजपासुन सुरुवात झाल्याची माहिती वासुदेव कोकाटे यांनी दिली, प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे सुध्दा उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये