देऊळगाव राजा तालुका काँग्रेस पक्षची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी पार पडली. अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते अनिल सावजी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामदास डोईफोडे, हनीफ शहा, होते.
यावेळी तालुका कार्यकारिणी गठित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले,बैठकीला प्रकाश राजे जाधव, विश्वासराव झिने, दिपक हिवाळे, रामेश्र्वर वायाळ, सय्यद भाई, केशव सानप, अंढेरा, बाबासाहेब कोल्हे,शिवाजी एडके, पंडितराव राजे, गणेश डोईफोडे तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश डोईफोडे यांनी आभार मानले.