12 एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथे प्रबोधनात्मक व्याख्यान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती व कामरेड शरद पाटील यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने अखिल भारतीय सत्यशोधक समाज व सत्यशोधक शिक्षक सभा बुलढाणा जिल्हा च्या वतीने 12 एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता आर्या लानस देऊळगाव राजा येथे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटेश महविद्यालय, देऊळगाव राजा येथील प्राचार्य डॉ गजानन जाधव राहतील. प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ विचारवंत लेखक संपादक मा उत्तम कांबळे, नाशिक हे आम्ही भारताचे लोक,,,, या विषयावर तर जेष्ठ शिक्षण तज्ञ मा रमेश बिजेकर, नागपुर हे वर्तमान राजकारणातील शिक्षणाचे आव्हाने या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत.
या प्रबोधनात्मक व्याख्यान चा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ श्याम मुडे यांनी केले आहे.