देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या निर्देशानुसार तालुका व जिल्हा कार्यकारी नव्याने गठीत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेले बुलढाणा जिल्ह्याचे निरीक्षक श्री राजेंद्र राख, जिल्हा संयोजक डॉक्टर इसरार, ओबीसीचे अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, काँग्रेस नेते अशोक पडघान , दीपक देशमाने यांनी सिंदखेडराजा मतदार संघाची काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक 8 एप्रिल रोजी देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन केले.
यावेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अनेकांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपले मत व्यक्त केले. अनेकांनी वेगवेगळी पदे स्वीकारण्याची तयारी दर्शविली. कार्यक्रमाचे अध्यक्षश्री राजेंद्र राख यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश दादा कायंदे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश डोईफोडे यांनी केले. याप्रसंगी डॉक्टर इसरार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व सिंदखेडराजा मतदारसंघात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जीवापाड मेहनत करण्याचे आवाहन केले.
बैठकीचे वेळी ज्येष्ठ नेते अनिल सावजी, हनीफ शहा, आतीश कासारे, नंदकिशोर शर्मा, प्रा अशोक डोईफोडे,रामेश्वर वायाळ, पंडित जाधव, शौकत अली, दत्तात्रय घुले, लंके, वाघमारे, नासेर बागवान, विनय लंगोटे, सत्यजित खरात, नामदेव राठोड, वाघमारे, सोपान खरात, मुन्ना शेख व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रदर्शन रामदास डोईफोडे यांनी केले.