ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यात जिवती पोलिसांना यश 

विधी संघर्ष बालक करित होता चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- पोलिस स्टेशन जिवती येथे ४ फेब्रुवारी २५ रोजी फिर्यादी नामे शामकाबाई राजेश चव्हाण वय ३० वर्ष व्यवसाय मजुरी रा. देवलागुडा यांनी तोंडी रिपोर्ट दिली की फिर्यादी हे काही दिवसापूर्वी आपल्या घराला कुलूप लावून स्वयंपाका करीता गावच्या बाजूला असलेल्या जंगलामध्ये लाकडे आणण्याकरिता गेली असता कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे दरवाजा उचलून कुंडी काढून घरामध्ये आलमारित ठेवलेले २०,००० रू नगदी व एकूण १२ तोळे चांदीचे दागिने किंमत ५,००० रू. माल चोरीला गेला आहे,अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच १५ मार्च २५ रोजी फिर्यादी नामे रमेश नारायण जाधव , व्यवसाय नोकरी वय ३३ वर्ष रा.शांतीनगर हे आपल्या मूळ गावी आपले परिवारासह होळी सण साजरा करण्याकरिता घराला कुलूप लावून गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे कुलूप फोडून घरातील आलमारीचा दरवाजा तोडून लॉकरमध्ये ठेवलेले नगदी ५२,००० रू व २ सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाचे व १ सोन्याची अंगठी १० ग्रॅम वजनाची किंमत १,५०,००० रू असा एकूण २,०२,००० रू माल चोरून नेला अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून जिवती पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वरील दोन्ही गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचे शोध कामी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू , उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या निदर्शनात पोलीस स्टेशनला पथक तयार करून सदर पथकामधील पोलीस उपनिरीक्षक निलेश वाडीवा, पोलीस अंमलदार जगदीश मुंडे, ज्ञानेश्वर डोकळे, किरण वाठोरे, अतुल कानवटे यांनी विधी संघर्ष ग्रस्त बालक वय १७ वर्ष ५ महिने रा. ताडी हिरापूर यास संशयावरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर वि. सं. बा. याने वरील दोन्ही घरफोडी केली असल्याची कबुली दिली असल्याने सदर वि.सं.बा. यांचेकडून मेमोरँडम पंचनामा करून पोलीस स्टेशनला दाखल केला असलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण १२ तोळे चांदीचे दागिने किंमत ५,००० रू व २ सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाचे व १ सोन्याची अंगठी १० ग्रॅम वजनाची किंमत १,५०,००० रू असा एकूण १,५५,००० रू माल जप्त केला असून सदर दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहे सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन जिवती येथील पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश वाडीवा करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये