ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लग्न समारंभात चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश राज्य रागजड जिल्ह्यातील आंतरराज्यीय गुन्हे करणाऱ्या टोळीकडुन 1 लाख 20 हजारावर जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 16/02/2025 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे फिर्यादी नामे अनिल जगन्नाथराव भोवरे वय 55 वर्ष रा सिंधी (मेघे) जि. वर्धा यांच्या मुलीचा आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल लग्नसोहळा चालु असतांना वधु व वरास नातेवाईकाकडुन शुभेच्छाच्या स्वरुपात देण्यात येणारे पैशांचे पॉकीट 1,20,000/- रोख रुपये चे पर्स कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करुन नेला वरुन फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन सेवाग्राम अप. क्र. 121/2025 भा. न्य. सं. 2023 कलम 303 (2) प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हा अज्ञात आरोपीतांने केला असल्याने तो उघड आणण्याकरीता स्था.गु.शा वर्धा येथील पथक यांनी घटणास्थळी भेट देली असता गोपनीय बातमीदाराच्या माहीतीवरुन सदर गुन्हा भारताचे विविध राज्यात लग्नसमारंभात करणा-या मध्य प्रदेश राज्य जिल्हा राजगड येथील कडीया सांसी या गावातील अंतरराज्य टोळीने एका अल्पवयीन मुलाचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने स्था.गु.शा वर्धा येथील एक पथक बोडा पोलीस स्टेशन जिल्हा राजगड मध्य प्रदेश येथे रवाना होवुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी 1) बसंत कुमार घासीराम धपाणी वय 37 वर्ष. 2) हसंराच मनोज छायल वय 32 वर्ष, 3) अल्पवयीन मुलगा सर्व राहणार कडीया सांसी जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरच्या आरोपीतांना त्यांच्या गावात ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच गावातुन पसार झाले वरिल नमुद आरोपीतांने गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमाल बाबत गोपनीय माहीतीवरुन घरझडती घेतली असता आरोपीताचा नातेवाईक अतुल सिसोदीया (जावई) रा. कडीया सांसी जि. राजगड यांचे घरझडतीत आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल वर्धा येथील चोरीस गेलेले नगदी 1,20,000/- रु मिळुन आले. ही चोरी केलेली रक्कम आरोपीतांनी अतुल च्या घरी ठेवलेली रक्कम दिनांक 04/04/2025 रोजी जप्ती पंचणामा करुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला. पोलीस स्टेशन सेवाग्राम जि. वर्धा यांचा ताब्यात देण्यात आला. नमुद गुन्ह्यातील पसार आरोपी शोध घेणे सुरु आहे.

सदरची कार्यवाही – मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनी प्रकाश लसुंते, पोहवा. शेखर डोंगरे, पो. शि. विकास मुंडे. पो.शि. सुगम चौधरी, पो.शि. शुभम राउत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये