ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषदेमार्फत शहराच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिल्यानेच करदात्यांनी वसुलीमध्ये सहकार्य केले

अरुण मोकळ प्रशासक ; नगर परिषद ने केली 93 टक्के कर वसुली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये देऊळगाव राजा नगरपरिषद प्रशासनाचे वतीने सर्वांगीन विकास कामे करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक प्रभागात नियोजनबद्ध विकास कामे केल्याने दरवर्षी शहरातील करदाते सुद्धा नप ला करवसूलीमध्ये सहकार्य करीत असल्यानेच या वर्षी सुद्धा करदात्यांनी 93% टक्के रक्कम भरून नगरपरिषद प्रशासनाला मदत केली आहे, व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे की नगरपरिषद प्रशासनाचे वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजक बद्ध आखणी करून शासन स्तरावर विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करून व वेळोवेळी लोकप्रतिनिधिंच्या माध्यमातून भरघोस निधी विविध विकास कामासाठी प्राप्त करून घेतला तर शहरासाठी अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता याकरिता शासनाकडून अंतर्गत पाईपलाईन व नवीन जलशुद्धीकरण केंद्रा सह पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकामासाठी निधी उपलब्ध करून घेऊन काम पूर्णत्वाकडे नेल्याने शहरवासीयांना येत्या काही काळात पिण्याचे पाणी नियमित मिळणार आहे तसेच अकृषक झालेल्या जमिनीमध्ये त्यांच्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ओपन स्पेस डेव्हलप करण्याचे कामास सुरुवात केलेली आहे शहराचा सर्वांगीण विकास सुरू असल्याने नगरपरिषद ने यावर्षी 93% टक्के कर वसुली करून जिल्ह्यात अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे यासाठी करदात्यानी मोलाचे सहकार्य केल्याचे प्रशासक अरुण मोकळ यांनी नमूद केले आहे. सन 24 25 मध्ये थकीत व चालू मागणी एक कोटी 26 लक्ष रुपयाची होती त्यापैकी करदात्यांनी एक कोटी सतरा लाख रुपये चा कराचा भरणा केलेला आहे तर पाणीपट्टीची मागणी 48 लाख रुपये होती त्यापैकी 46 लाख रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे कोणत्याही करदात्याकडून सक्तीने करवसुली करण्यात आलेली नाही कर वसुलीसाठी नगर परिषद प्रशासनाचे एम.जे. शहा कर अधिक्षक, अहमद हुसेन,संतोष रांधवन, कैलास माने, युनूस पठाण, मोहम्मद रेहान, मनोज अग्रवाल, विकास साळवे, राजू देवउपाध्ये, शिवाजी पवार, रुस्तम मोरे, साहेबराव खरात, पवन गवई, राहुल चांडगे, तर अंकित बेलोकार पाणीपुरवठा पर्यवेक्षक यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली साठी सहकार्य केले,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये