ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोनुर्ली येथे महात्मा गांधी विद्यालयात माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आरो प्लांट चे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली येथे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आरों प्लांट चे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास करून मोठे लक्ष गाठून आयुष्यात यशस्वी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, संचालक राहुल बोढे, विकास भोजेकर,मुख्याध्यापक बबन भोयर, सौ पुजा देवतळे, यादव खिरवटकर, सूर्तेकर, दालमिया सिमेंट च्या स्नेह उपगनालावार, विकास भडके, तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,गावकरी उपस्थित होते.