घुग्घुस येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वितरण
चांदा ब्लास्ट
घुग्घुस: येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवार, ६ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वितरण करण्यात आले.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त घुग्घुस शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी रामभक्तांना मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते शीतपेयाचे वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी सभापती नितु चौधरी, भाजपाचे साजन गोहने, दिनेश बांगडे, चिन्नाजी नलभोगा नितीन काळे, विवेक तिवार, धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे, प्रमोद भोस्कर, हेमंत कुमार, असगर खान, अनिल मंत्रिवार, सुनील राम, लक्ष्मी नलभोगा, शारदा गोडसेलवार, सुचिता लुटे, सुनीता घिवे, शंकर सिद्दम, गणेश राजूरकर, उमेश दडमल, सुनंदा लिहीतकर व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.