आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

५०० शाळकरी मुलामुलींची (रॅली) प्रभात फेरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शाळा / कॉलेज झोपडपट्टी परिसरात जनजागृती कार्यक्रम

शहरात अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत प्रदर्शनात्मक कार्यक्रम

२६ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत डिसें १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्राचे आम विधी मंडळामध्ये निर्णय घेण्यात आला त्यास अनुसरुन दर वर्षी २६ जुन हा अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणुन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस आज दिनांक २६.०६.२३ रोजी वर्धा जिल्हा पोलीस दलाचे वतीने वर्धा शहरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करीता सकाळी ०८.०० वाजता ५०० शाळकरी मुलामुलींची प्रभात फेरी (रॅली) आयोजीत करण्यात आली व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबतचे महत्त्व समजावुन सांगितले. तसेच एन.जी.ओ. च्या मार्फतीने पथनाट्य सादर करण्यात आले. शाळा / कॉलेज झोपडपट्टी परिसरात जनजागृती कार्यक्रम घेवुन युवक-युवतींना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या धोक्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर जनजागृती करण्यासाठी ट्रक चालक, ऑटो चालक व दुचाकी व मोहल्यामध्ये नागरिकांमध्ये पाम्पलेटसचे वाटप करण्यात आले, गांवामध्ये व शहरात अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत प्रदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, बॅनर/ होर्डींग्ज / पाम्फलेट्स द्वारे बस स्टॉप / रेल्वे स्टेशन तसेच शहरातील मोठे चौरस्ता, शाळा, कॉलेज व गर्दीच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात प्रसिध्दी करुन जनजागृती करण्यात आली.

तसेच दि. २७.०६.२३ रोजी पो.स्टे कारंजा अपराध क्र. ३२७ / २२ (२६५.३२५ किलो ग्राम गांजा) व पो.स्टे. रामनगर अपराध क्र. २४१/२१ (१४९.२०० किलो ग्राम गांजा) नाश प्रक्रियेद्वारे नष्ट करण्यात येत आहे.

वरिल प्रमाणे विविध उपक्रम राबवुन कार्यक्रमांचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली व २६ जुन २०२३ हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये