ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुनपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे येथील तहसील कार्यालय तथा पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास जलद गती न्यायालयात करण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, पीडितेच्या कुटुंबाला शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात यावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहे. निवेदन सादर करताना अर्जुन लांजेकर, हनुमान घोटेकर, ऋषी वरखडे, तरुण मिश्रा, अनुज आगलावे, श्याम वैद्य आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये