ताज्या घडामोडी

पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाविरोधात 22 माजी नगरसेवकांचे धरणे

खाजगीकरणाकरिता काढलेली निविदा मागे घेण्यात यावी

चांदा ब्लास्ट :

मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी मनपाच्या पाणीपुरवठा योजनेचे आडमार्गाने खाजगीकरण करण्यात येत असल्याचा आरोप सुमारे 22 माजी नगरसेवकांनी केलेला आहे. प्रस्तावित खाजगीकरणाच्या विरोधात आज भाजप वगळून इतर सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. यानंतर मनपा आयुक्त बिपिन पालीवाल यांना निवेदन देऊन प्रस्तावित खाजगीकरणाकरिता काढलेली निविदा मागे घेण्यात यावी व पाणीपुरवठा योजना चालविण्याचे मूलभूत कर्तव्य मनपा प्रशासनाने स्वतः पार पाडावे अशी मागणी आंदोलनकर्त्या माजी नगरसेवकांनी केली.

या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक पप्पू देशमुख,दिपक जयस्वाल, सचिन भोयर,गोपाल अमृतकर,प्रदिप डे,आकाश उर्फ पिंटू साखरकर,प्रशांत दानव,मंगला आखरे,अशोक नागपुरे,प्रसन्ना उर्फ पिंटू शिरवार,मनोरंजन राय,सुनिता अग्रवाल,सकीना अन्सारी,पुष्पाताई मुन,एकता गुरले,हनुमान चौखे,राजेंद्र आखरे,विनोद लभाने,राजेश अडूर,निलम सचिन आक्केवार,बापू अन्सारी,स्नेहल रामटेक या माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला. माजी नगरसेवक रितेश उर्फ रामू तिवारी, दिलीप रामीडवार ,डॉ. सुरेश महाकुळकर,संतोष लहामगे तसेच माजी महापौर संगीता अमृतकर यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे. शहरातील शेकडो नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

धरणे आंदोलनाची दखल घेऊन  खाजगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आंदोलनकर्त्या माजी नगरसेवकांनी दिलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख राजेंद्र वैद्य महिला आघाडी प्रमुख बेबीताई उईके, अ.भा. रिपब्लिकन पक्षाच्या निर्मला नगराळे, वंचित बहुजन आघाडीचे अंकुश वाघमारे,काँग्रेसच्या श्रृती कांबळे, मनसेचे नितीन भोयर, जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, मनीषा बोबडे सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी संजय गुजरकर तसेच शहरातील शेकडो नागरिकांनी या आंदोलनामध्ये उपस्थिती दर्शवली.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये