ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

IPL live मॅचवर सट्टा जुगार चालवीणाऱ्या बुकीवर जुगार कायद्यान्वाये रेड

एकुण 9 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या पथकाने मुखबीरचे खबरेवरून IPL लाईव्ह मॅचवर पैसे हारजितचा सट्टा चालवीत असलेल्या बुकीच्या घरी दोन पंचासह रेड केला असता यातील वर नमूद आरोपी हे घरातील LED टीव्हीवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स व कलकत्ता नाईट रायडर लाईव्ह क्रिकेट मॅचवर आरोपी 1) मिथुनसिंग अवतारसिंग बावरी, वय 32 वर्ष, रा.इंदिरा नगर, कारंजा (घा), जि. वर्धा हा आरोपी 2) अर्जुनसिंग अजाबसिंग बावरी, वय 26 वर्ष, रा.इंदिरा नगर, कारंजा (घा), जि. वर्धा 3) राहुल संजय भांगे, वय 27 वर्ष, रा.जगदंबा कॉलनी कारंजा (घा), जि. वर्धा 4) आदित्य नारायण बाजारे, वय 24 वर्ष, रा. वार्ड क्र 8 कारंजा (घा), जि. वर्धा 5) प्रदीप गजानन बैगणे, वय 24 वर्ष, रा. कारंजा (घा), जि. वर्धा पसार यांच्या सोबत संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता पैसे हार जितचा IPL क्रिकेट जुगार खेळ खेळताना मिळून आले, पोलीस रेट पडला त्यावेळी यातील आरोपी 6) संजयसिंग बावरी , रा. इंदिरा नगर कारंजा (घा), जि. वर्धा संजय बावरी हा लघवीला गेलेला असल्याने परस्पर एका मोबाईल संचासह पसार झाला, तसेच यातील मुख्य आरोपी मिथुनसिंग बावरी हा IPL प्राप्त सट्टा हा पुढे यातील नमूद आरोपी 7) वाजिद पठाण, जलालखेडा, जि. नागपुर 8) गुड्डू नावाचा इसम पूर्ण नाव माहित नाही, रा. अमरावती यांच्याकडे मोबाईल द्वारे पास करीत असल्याबाबत आरोपी मिथुनसिंग बावरी याने सांगितल्याने सदर गुन्ह्यात सदर दोन्ही इसमांना आरोपी करण्यात आले. याप्रमाणे कारवाई करून एकूण1) रोख रक्कम 25,710/- रु.2) एक ओनिडा कंपनीचा 55 इंचाचा स्मार्ट LED टी.व्ही कि 30,000/- रु 3) एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्र MH 46X 9150 किं 5,00,000/- रु 4) जुगारा साठी वापरलेले 8 महागडे अँड्रॉइड मोबाईल ज्यात आयफोन-2, विवो-3, सॅमसंग-2 , रेडमी-1 एकूण कि 4,13,000/- रु 5) मॅच दरम्यान बेटिंग चे आकडे लिहलेले 2 कागद.6) टाटा प्ले सेट टॉप बॉक्स, दोन कॅल्क्युलेटर, खर्डा, पेन 3,910/- रु असा एकूण जुमला किंमत 9,72,620/-रु जुमला किंमत 9,72,620 /- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी 1) मिथुनसिंग अवतारसिंग बावरी, वय 32 वर्ष, रा.इंदिरा नगर, कारंजा (घा), जि. वर्धा 2) अर्जुनसिंग अजाबसिंग बावरी, वय 26 वर्ष, रा.इंदिरा नगर, कारंजा (घा), जि. वर्धा 3) राहुल संजय भांगे, वय 27 वर्ष, रा.जगदंबा कॉलनी कारंजा (घा), जि. वर्धा 4) आदित्य नारायण बाजारे, वय 24 वर्ष, रा. वार्ड क्र 8 कारंजा (घा), जि. वर्धा 5) प्रदीप गजानन बैगणे, वय 24 वर्ष, रा. कारंजा (घा), जि. वर्धा पसार यांना पो.स्टे कारंजा (घा ) यांचे ताब्यात पुढील तपास करीता देण्यात आले.

कारवाई पथक पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद चौधरी, पो. उपनि. राहुल इटेकर, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा, तसेच ना.पो. अं. गोविंद मुंडे, सायबर सेल, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये