ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुंड व दारुविक्रेत्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील राहणारा डांगरी बाई, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड संजय बासुदेव यूटरकर, वय २९ वर्ष, राह डांगरी वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाट अभिलेखावर सन २०१९ पासून शरीरा विरुध्द, तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण १५ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक शस्त्रासह बाळगणे, शस्त्र बाळगुन गंभीर दुखापत करणे, चोरी करणे, विनयभंग करणे, दारुचो बाहतुक करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. आणि सतत गुन्हे करण्याच्या सबईचा गुन्हेगार होता. त्या पैकी संपूर्ण १४ गुन्हे न्यायप्रविष्ठ असुन ०१ गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबीत आहे. मागील ४ ते ५ वर्षापासून स्थानबध्द ईसम नामे संजय वासुदेव बुटरकर, बम २९ वर्ष, राह डांगरी वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा बाने पोलीस स्टेशन, हिंगणघाट परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे बिरुथ्य पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवून सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. संजय वासुदेव युटरकर, वय २९ वर्ष, राह. डांगरी वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, हिंगणघाट अंतर्गत येणान्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचे व त्याचे गुन्हेगारी गतिवोधी यांबा नसल्याने त्याचे विरुध्द सन २०२२ मध्ये कालम ११० (ई) (ग) फौजदारी प्रकीया संहीता, सन २०२४ मध्ये गाववंदी असतांना सुद्धा दोन गुन्हे नोंद आहेत. परंतु स्थानबध्द ईसम हा अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्या अनुषंगाने तत्कालीन पोलीस निरीक्षक, श्री. मनोज गभणे यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हागभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, घोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक मस्तुया काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अग्यपे स्थानबध्द करण्याचावतया प्रस्ताव मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा निहाधिकारी, मा. श्रीमती यान्मथी सी. यांना केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा निजहाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २४ मार्च २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास अमरावती मध्यवती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्यास अमरावती मध्यवती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

आगामी येणारे सण उत्सव निर्भीड व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अशा अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्या करीता पुरवा करण्याऱ्या विक्रेत्यांवर तसेच समाजातील गुंड प्रवृतीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्षा श्रीमती वान्मयी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहे.

२०२४ मध्ये आज पावेतो एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृतीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत जेल मध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो ०६ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृतीच्या धोकादायक व्यक्तींना जेल मध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.

मा. जिल्हाधिकारी, वर्षा मा. पोलीस अधीक्षक, वां यांचे बेधडक मोहीमे मुळे अवैध दारू विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, डी. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, मर्धा, श्री. रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. विनोद चौधरी, रथानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली स.पो.नि. पंकज वाघोडे, स.पी. संजय खारनारकर, स. फो. गिरीश कोरडे, पो. हवा. अमोल आक्रम, पो.हवा. आशिष महेशगीरी नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, तत्कालीन पो.नि. मनोज गभणे, पो.नि. देवेंद्र ठाकुर पोलीस अंमलदार पो.हा प्रविण देशमुख, आशिष मेश्राम, विजय हारपुर पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये