अवैध देशी दारूची वाहतूक., आरोपी ताब्यात
एकूण 9 लाख 90 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 23/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उपविभाग हिंगणघाट पथक तर्फे पो. स्टे. वडनेर परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून यातील मौजा शिरसगाव शिवार परिसर आरोपीतांवर प्रो. रेड केला असता यातील आरोपी 1) संतोष शिवप्रसाद सलामपुरिया, वय 47 वर्ष, रा. वार्ड नं. 4 बांगर नगर, यवतमाळ त. जि. यवतमाळ व 3) प्रफुल उर्फ पप्पू दिवाकर जिवतोडे, रा. पंचशील नगर, वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा,(पसार) हे त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार मध्ये देशी दारू ची अवैधरित्या बिना पास परवाना वाहतूक करून आरोपी 2) चंदू दिवाकर जिवतोडे, वय 28 वर्षे, रा. पंचशील नगर, वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा चे मदतीने त्याच्या ताब्यातील मोटर सायकलने देशी दारूचा माल सप्लाय करण्याकरता मदत करीत असतांना आरोपी 1) संतोष शिवप्रसाद सलामपुरिया, वय 47 वर्ष, रा. वार्ड नं. 4 बांगर नगर, यवतमाळ त. जि. यवतमाळ, व 2) चंदू दिवाकर जिवतोडे, वय 28 वर्षे, रा. पंचशील नगर, वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा, हे मोक्यावर मिळून आले व आरोपी क्रमांक 3 हा पसार झाला. आरोपी 1) संतोष शिवप्रसाद सलामपुरिया, वय 47 वर्ष, रा. वार्ड नं. 4 बांगर नगर, यवतमाळ त. जि. यवतमाळ, व 2) चंदू दिवाकर जिवतोडे, वय 28 वर्षे, रा. पंचशील नगर, वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा, यांचे ताब्यातुन देशी दारू, चार चाकी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार व मोटर सायकल सह एकूण जू किंमत 9, 90, 000/-रू चा मुद्देमाल मिळून आला.
सदरचा माल हा आरोपी 4) दिपक मेश्राम, रा. यवतमाळ (पसार) याचे पासून खरेदी केल्याचे सांगितल्याने चारही आरोपीतां विरुद्ध पो. स्टे. वडनेर येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई माननीय पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे ठाणेदार पोस्टे वडनेर, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, मनीष कांबळे, दिनेश बोतकर, अंकित जीभे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा अमोल खाडे पोलीस स्टेशन वडनेर यांनी केली.