ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने “जीवन गाणे गातच जावे” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई मार्फत व अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षणालय, कारागृह व सुधारसेवा कार्यालय, पुणे यांच्या विशेष सहकार्याने राज्यातील ३६ कारागृहात बंदीस्त असलेल्या कैदयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात मध्ये देशप्रेम, बंधुभाव जागृत करण्यासाठी कैदी बांधवा करीता मनोरंजन, प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक २५/०३/२०२५ रोजी वर्धा जिल्हा कारागृह येथे राबविण्यात आला.

कारागृहातील बंदयांचाही भावनिक विकास होवुन त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने शासन नियमितपणे वेगवेगळे उपक्रम राबवत असते, समाज विघातक वृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंदयांचे देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातुन समुपदेशन व्हावे, संगीताच्या माध्यमातुन प्रबोधन करुन त्यांना सकारात्मक विचारांकडे घेऊन जाण्यासह त्यांच्यात देशभक्तीची भावना जागवत गुन्हेगारी प्रवृत्तीपासुन दुर घेऊन जाणे या उद्देशाने वर्धा जिल्हा कारागृहात ” जीवन गाणे गातच जावे ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विविध मान्यवर यांची उपस्थिती लाभली असुन उपस्थितांनी कैदयांचे प्रबोधन करुन नवीन विचाराने चांगले आयुष्य जगण्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. जिवन वाघ यांनी केले असुन तसेच कार्याक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुहास इंगळे (तिगांवकर), गायक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात झाली तर विविध देशभक्तीपर गीतांवर कार्यक्रम सादर होत असतांना बंदी बांधवांनी टाळयांनी साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली सादर होत असलेल्या प्रत्येक गीताला भारत मातेचा जयघोष करत कारागृहातील वातावरण देशभक्तीमय झाले होत. कार्यक्रमात कैदयांनी देखील आपल्या सुप्त कलागुन याठिकाणी सादर केले व यापुढे चांगले आयुष्य जगण्याचे संकल्प केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा मा. श्री. विवेक देशमुख, मुख्य लोक अभिरक्षक, वर्धा अॅड. श्री. सुशांत काशीकर, उप मुख्य लोक अभिरक्षक, वर्धा, अॅड. श्री. दिलीप वर्मा, सहाय्यक लोक अभिरक्षक, अॅड. मनिष सावरकर, अॅड. प्राची भगत, अॅड. कल्याणी गडपाल, अॅड. दिनेश कोल्हे, कारागृहाचे अधीक्षक, श्री. नितीन एस. क्षिरसागर, कार्यक्रम समन्वयक श्री. जिवन वाघ, तसेच तुरुंगाधिकरी श्री. जितेंद्र भावसार, सुभेदार श्री. संजय वंजारी, शिपाई अमित कोठारकर, अतुल जाधव, रोहीत साखरकर, धृवास पठाडे ईत्यादी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये गायनांनी मंत्रमुग्ध करणारे गायक श्री. सुहास इंगळे (तिगांवकर), प्रांजली गायकवाड, मयुर पटाईत, यांनी वेगवेगळे गाणे सादर करुन बंदयांच्या उत्साह वाढविला तसेच त्यांना साथ देणारे कीबोर्ड वादक आदित्य खंदार, तबला वादक जिवन वाघ, ढोलक वादक स्वप्नील कावळे, ऑक्टोपॅड वादक-निलेश दुधाणे यांनी सुध्दा त्यांना योग्य प्रकारे साथ देवुन कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यानंतर कार्यक्रमाचे अभार प्रदर्शन कारागृह अधिक्षक श्री. नितीन एस. क्षिरसागर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये