ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी विद्यार्थ्यांचा मूल -मारोडा (सोमनाथ) येथे स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

मुल-एक दिवस मैत्रीसाठी, स्वतःसाठी-“अभी नही तो कभी नही “या संकल्पनेखाली कृषी तंत्र विद्यालय मुल मारोडा (सोमनाथ) 2011 -12 च्या बॅचचे माजी विद्यार्थि तब्बल बारा वर्षांनी एकत्र आले या स्नेह मिलन सोहळ्याच्या निमित्याने शिक्षकांचा सत्कार आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शिक्षकांचा सन्मान सोहळा ‌

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री गजघाटे सर (माझी प्राचार्य) तर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री दडमल सर (प्राचार्य) व प्रमुख अतिथी माननीय श्री बर्डे सर व आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांचा विशेष सत्कार करून त्यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीची दिशा मिळावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

स्नेह मिलनासाठी उत्तम नियोजन:

या स्नेह मिलन सोहळ्याचे नियोजन उत्कृष्ट प्रकारे करण्यात आले होते नियोजन मंडळात अध्यक्ष-चेतना गनवीर कोषाध्यक्ष- सोनाली गेडाम उपाध्यक्ष -आशिष बावणे, प्रशांत घोडे,प्रवीण वाटकर सहसचिव-प्रज्ञा जांभुळकर होनाजी मडावी,यांच्यासह उमेश उरकुडे,शितल भडके प्रशांत गेडाम,स्मिता वाढई,उमेश उडान,श्वेता पुलावर, पल्लवी भडके, वामेश गुरनुले, विजय काळेवार,राकेश गुरनुले ,गुरुदेव वासेकर,संगीता बनसोड,निखिल उंदीरवाडे, सोनाली वासेकर, मानसी नन्नावरे, प्रतिमा नळे,साहिल गेडाम,प्रियंका घोरपडे स्वीटी पिटलवार,किरण गायकवाड, बळीराम जाधव, आशिष चुनारकर, मेघा साखरे,मंगेश आलाम, पंकज सुकारे, यांनी विशेष मेहनत घेतली.

तर बारा वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या मित्र मैत्रिणी सोबत मनमोकळ्या गप्पा आठवणींना पुन्हा एकदा आनंद घेत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 2011- 2012 च्या सर्व माजी विद्यार्थिनी सहकार्य केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन -चेतना करमणकर. यांनी केले. तर आभार प्रदर्शन शितल भडके यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये