ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. हक्के यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार-२०२५ प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      भद्रावती येथील प्रसिद्ध दंतरोगचिकित्सक डॉ. मनोज हक्के यांना नुकताच नाशिक येथे संपन्न एका कार्यक्रमात महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार-२०२५ प्रदान करण्यात आला आहे. एक आघाडीची संशोधन, चित्रपट आणि पुरस्कार कंपनी रिसील.इन द्वारा एका सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. मनोज हक्के हे शहरातील एक प्रसिद्ध दंतरोग चिकित्सक आहेत. मागील २० वर्षांच्या काळापासून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा दिलेली आहे. मेळघाट येथील आदिवासी बहुल भागात जावून त्यांनी वैद्यकीय सेवा प्रदान केलेली आहे. गोरगरीबांना निःशुल्क सेवाही ते देत असतात.

नाशिक येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते डॉ. हक्के यांना सदर पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या उपलब्धी निमित्त डॉ. हक्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये