ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर कळमगाव येथे पोलिसांनी पकडला
ट्रॅक्टर चालक व मालक फरार असल्याचे पोलीसांनी सांगीतले
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम
सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव मार्गा कडे जाणाऱ्या रोडवर शासनाचा विना परवाना रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाहन क्रमांक -MH- 34 ,BV-7646 व विना नंबर असलेली ट्राली असा अंदाजे एकुण किमंत -6 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला असुन ट्रॅक्टर – ट्राली जप्त केला आहे. अवैध रेती ची ट्रॅक्टर वाहतुक करनारा चालक घटनास्थळावरून पळुन गेल्याची माहीती पोलीसांनी सांगीतले आहे.तसेच सिंदेवाही पोलीस विना परवाना शाषनाचा रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकाचा शोध घेत आहेत. अश्याप्रकारची ही कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार तुषार चव्हाण यांनी केली आहे.