ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी मंदिर समोर कलगीतुराचा सवाल जबाब गायनाचा कार्यक्रम संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील ग्राम दैवत श्री बालाजी मंदिरा समोर दरवर्षी प्रमाणे या वर्षीही कलगीतुराचा सवाल-जवाब कार्यक्रम दि 14 मार्च 2025 शुक्रवार रोजी पार पडला.

 सुमारे 350 वर्षा पासून श्री बालाजी संस्थानच्या वतीने सदरहू कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सवाल-जवाब गायनाचा कार्यक्रम आटोपून सरतेशेवटी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त विद्यमान राजे विजयसिंहजी जाधव यांचेकडून कलगी व तुरा दोन्ही संघाच्या प्रमुखाऩा शाल, श्रीफळ आणि फेटा (पागोटे 60 फुट लांबीचा) बांधण्याचा मान गुरु श्री संत महाराज, कलगीवाले आणि श्री हरदास तुरेवाले यांना विरंगुळा मनोरंजन म्हणून स्पर्धेने बांधण्याचा दोघांनाही मान दिला जावून कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये