ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.संजय गोरे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधन मान्यता समितीवर नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधन मान्यता समितीवर(आर आर.सी.)स. गा. अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अन्वये परिनियम 1/2024 मधील परिच्छेद 7 अन्वये राज्यशास्त्र विषयाचे तज्ञ म्हणून निवड केली आहे.

      संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने याकरिता जाहिरात काढली होती. त्यात महाराष्ट्रातून विविध विद्यापीठातून एकूण 15 अर्ज आले होते. यामधून डॉ.संजय गोरे यांची गुणवत्तेच्या आधारावर कुलगुरूंनी नियुक्ती केली. डॉ. संजय गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 10 विद्यार्थ्यांना पीएचडी प्राप्त झाली आहे. त्यांचे राज्यशास्त्र विषयावरील 7 संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये 87 संशोधन लेख प्रकाशित झाले आहे . डॉ.गोरे यांनी गेल्या 10 वर्षापासून गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर व समित्यांवर महत्त्वपूर्ण काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

          डॉ.संजय गोरे हे शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे राज्यशास्त्राचे प्रोफेसर आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख व गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आहेत.डॉ .गोरे यांना गोंडवाना विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना चे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार तसेच विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ.गोरे यांनी या आधी रा.तु.म नागपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य तसेच गोंडवाना विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विद्यापरिषद सदस्य म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्य केले आहे.

      डॉ.संजय गोरे हे शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कार्य करणाऱ्या गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधन व निमित्त समितीवर निवड झाल्याबद्दल विदर्भ राज्यशास्त्र परिषदेचे व महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य व मित्रमंडळाने अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये