ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘भामसं’ चे २० वे त्रैवार्षिक अधिवेशन उद्यापासून भद्रावतीत

विदर्भभरातून सातशेवर प्रतिनिधी होणार सहभागी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 विदर्भ प्रदेश अध्यक्ष शिल्पा देशपांडे, महामंत्री गजानन गटलेवार यांची पत्रपरिषदेत माहिती

     भारतीय मजदूर संघाचे २० वे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार २७ आणि रविवार २८ जानेवारी रोजी भद्रावती येथे आयोजित करण्यात आले असून, या अधिवेशनात विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील भारतीय मजदूर संघाचे सहाशेवर कामगार प्रतिनिधी, कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भामसंच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष शिल्पा देशपांडे, महामंत्री गजानन गटलेवार यांनी गुरुवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात देशभरातील कामगारांच्या मागण्यांवर आणि समस्यांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, समान कामाचे समान वेतन यानुसार कंत्राटी कामगारांना लाभ देण्यात यावा, राज्य विमा कामगार योजनेची सध्या असलेली २१ हजार रुपये प्रतिमाह वेतन ही मर्यादा बदलून ३५ हजार रुपये प्रतिमाह करण्यात यावी, योजनेतील सभासदांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांवर या अधिवेशनात प्राधान्याने चर्चा करण्यात येणार आहे. भामसंच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष शिल्पा देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय संघटनमंत्री सुरेंद्रन यांच्या हस्ते होणार असून, वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, भामसंचे अ.भा. महामंत्री रवींद्र हिंमते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रा. अतुल मोघे, प्रांत सहसंपर्क प्रमुख अरविंद कुकडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. उपाध्यक्ष नीता चौबे, पश्चिम-उत्तर क्षेत्र संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, विदर्भ महामंत्री गटलेवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेला देण्यात आली. यावेळी भामसं जिल्हाध्यक्ष विवेक अल्लेवार, प्रमोद येलचलवार, प्रवीण मुनगंटीवार, परशुराम उगे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये