Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंभारी येथे शालेय साहित्याचे वाटप 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघ चे माजी अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ खांडेभराड यांच्या वाढदिवसानिमित्त 23 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंभारी येथे विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच परमेश्र्वर खांडेभराड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ खांडेभराड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश नरवडे, सेवानिवृत्त प्राध्यापक पत्रकार अशोक डोईफोडे, माधव खांडेभराड, रखमाजी सपकाळ, नारायणराव सपकाळ, मुख्याध्यापक संजय गायके, बालाजी पवार होते.

सत्कारमूर्ती काशिनाथ खांडेभराड यांचा सत्कार शाल, पुष्पहार घालून कऱण्यात आला, विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे व चॉकलेट चे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून संस्कारक्षम बनून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन काशिनाथ खांडेभराड यांनी केले. रमेश नरवडे व प्रा अशोक डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभारप्रदर्शन शिक्षक बालाजी पवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये