ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुवन देरकर कारागृह पोलीस भरतीत नागपूर विभागातून अव्वल!

भुवनने यशाचे श्रेय स्पर्धा परीक्षा शिक्षक रोहित जंगमवार यांना दिले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

 बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील किराणा दुकान मालक रमेश देरकर यांचा मुलगा भुवन देरकर याने कारागृह पोलीस भरतीत नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावून बल्लारपूर तालुक्याचे नाव उंचावले आहे. त्यांच्या यशाची माहिती मिळताच त्यांचे मित्र आणि ग्रामस्थांनी त्यांच्यावर गुलालाची उधळण करून जल्लोष केला. भुवनने बल्लारपूर शहरातील स्टडीट्रॅक ॲकॅडमीत रोहित जंगमवार सरांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीची तयारी केली होती, या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भुवन त्याच्या यशाचे श्रेय त्याचे पालक आणि स्पर्धा परीक्षा शिक्षक रोहित जंगमवार यांना देतो.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये